बजाज स्कूटरीने माणसे हलवली, 'अ'पासून
'ब'पर्यंत नेली, 'ब'पासून 'क'पर्यंत नेली, 'क'पासून 'ड'पर्यंत... माणसे
शब्दशः हलली, पण माणसे तिथेच राहिली. विशिष्ट उद्देश असूनसुद्धा एका अर्थी
निर्बुद्ध हलणे... किंवा गती असूनही स्थितीस्थापकत्त्व असणे... किंवा
स्थितीस्थापकत्व संगे घेऊनच हलणे... हे जगातील कुठल्याही मध्यमवर्गाचे
व्यवच्छेदक लक्षण.
अप्रतिम! अशा प्रकारचा इतका चांगला लेख मराठी आंतरजालावर मी तरी वाचलेला आठवत नाही.