मन .. काव्य खरोखरच चांगले आहे . गझल ची पुर्वतयारी आहे.
उमराव जान च्या गुरुने तिला सांगितले होते . बेटी नज्म अच्छी लिखती हो. मगर गझल लिखना चाहती हो तो अल्फाज मे वजन पैदा करो.
गझल केवळ तांत्रिक रचनाच नाही. तांत्रिक रचना तर अवघड आहेच. पण खरा कस लागतो तो तिच्यात गझलेचा प्राण ओतताना.
मतला, उला मिसरा, सानी मिसरा, शेर, काफिया, रदिफ, बहर .. हे सगळे तर साधलेच पाहिजे. पण त्यापेक्षा अधिक आव्हान आहे ते वजन, जमीन आणि आयाम पैदा करण्यात.
होता न साधा एव्हढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला पुरे आयुष्य तारण राहिले ... सुरेश भट
गझलेच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा !
प्रसन्न शेंबेकर