वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
परवा अस्मादिकांचा दिवस नेहमी प्रमाणेच उगवला. अर्थात आधीचा दिवस पण नेहमी प्रमाणेच मावळला होता. म्हणजे अंथरुणाला पाठ टेकायला १:३० वाजून गेला.. रात्रीचा.. (उगाच am/pm चा गोंधळ नको व्हायला... तुमचा... आणि माझाही थोडा..) आमच्या छोट्या डॉन च्या कृपेने झोपायला जवळपास २ वाजले. (आणि हे अस बरेच दिवस चालू होत. शेवटी त्याची सगळी कसर आज भरून निघाली.) कसाबसा ८ ला उठलो सकाळी आणि धडपडत, अर्धवट झोपेतच १० च्या सुमारास पोचलो ऑफिसला. (ही अतिशयोक्ती नाही).. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागलं कि काही विशेष वाटत नाही झोपेचं किंवा दमल्याचं. साधारण १ च्या सुमारास ...