यांची (कदाचित बोलीभाषेत असतील पण) कळाले, जळाले, गळाले अशी वैकल्पिक रूपे ऐकू येतात.  परंतु, पळाले, मिळाले यांची पळले, मिळले अशी रूपे बोलीभाषेतही होत नाहीत. याउलट, तळले, गोंधळले, जुळले, चळले, टळले, डळमळले, फळले, गिळले यांची फक्त ळल्यान्तरूपे होतात.