संस्कृत शब्दांत अनेकदा शब्दाच्या शेवटच्या अक्षरातला इकार-उकार ऱ्हस्व असतो. मराठीत आणि, परंतु, आणि नि हे तीन शब्दच तेवढे ऱ्हस्व इकारान्त आहेत. संस्कृत शब्द टंकताना मनोगताचा शुद्धिचिकित्सक त्यांतले इकार/उकार दीर्घ करतो. त्यामुळे वरील लेखनात बिभर्ती, पृच्छामी, पदानी, किमपी अशी चुकीचे शब्द टंकित झाले आहे. हे टाळायचे असेल तर, (१)पदान्ती येणाऱ्या ऱ्हस्व मात्रा-उकारानंतर 'डॉट् एस्' ह्या कळी दाबा. (२) विरामचिन्ह किंवा दुसरे कुठलेही अक्षर टंकित करा आणि लगेच खोडून टाका.  म्हणजे बिभर्ति, पृच्छामि, पदानि, किमपि  असे ऱ्हस्व इकारान्त शब्द उमटवता येतील. अन्यथा,(३) शुद्धिचिकित्सक बंद ठेवून टंकलेखन करा.