आनन्द येथे हे वाचायला मिळाले:

आमच्या घरच्या आवारात पक्षांची वर्दळ असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक पक्षी घराच्या आजूबाजूला भेट देऊन जातात. पांढऱ्या पोटाचा आणि लांब चोचीचा खंड्या, हिरव्या पायांचा, बगळा आणि बदकाच्या मधला वंचक, पिवळ्या पोटाचा आणि धोबी कपडे बडवतो तशी आपली शेपटी आपटणारा धोबी, पोपटासारखा पण आकाराने चिमणीएवढा वेडा राघू, पिवळ्या, करड्या पायांचे बगळे, सोनेरी पंखांचा भारद्वाज, असंख्य प्रकारचे, रंगांचे, आकाराचे फुलचुखे, उंच आकाशात उडणाऱ्या आणि तेवढ्याच उंच नारळावर असलेल्या त्यांच्या घरात राहणाऱ्या घारी, डोक्यावर तुरे असलेले, काही चेहऱ्यावर केशरी साज असलेले, ...
पुढे वाचा. : पक्षी