ठाय आणि ठाव हे दोन्ही मूळ संस्कृतमधील स्थानवरून मराठीत आलेले तत्भव शब्द.
मराठी अर्थः ठाय=ठिकाण, प्रकार, निश्चय. ठायणे(अप्रचलित) म्हणजे उभा राहणे, जागा-आसरा देणे(दे माय धरणी ठाय!); ठाय ठिकाण=ठाव ठिकाण=ठावा ठिकाणा; ठायीठायी=जागोजागी; ठायी पडणे=ठाव लागणे=पत्ता सापडणे/(थांग)पत्ता लागणे; ठायीचा=मूळचा.
शिवाय, ठायीठाव=ठायेठाव=तत्काळ; खरोखर; परिपूर्ण. बालकवींची कविता रसाने ठायेठाव भरलेली आहे. ठाव लागणे=जलाशयाचा (थांग)तळ लागणे. वगैरे.
यावरून ठावा/ठावे आहे, ठावे नसणे, ठावके नसणे, ठाऊक असणे/नसणे; ठाव सोडणे जागा/धीर सोडणे वगैरे शब्दप्रयोग मराठीत आले असावेत.