कळले-कळाले प्रमाणेच उडले-बुडलेची दोनदोन रूपे होतात. पडले-गाडलेची का होत नसावीत?  मात्र, निघणे-निघाला(निघला नाही!)तसेच भागाकार केला या अर्थीचा शब्द-भागले याचे भागितले हेही रूप होते, तशी मागितले-सांगितलेची दोन रूपे ऐकू येत नाहीत.

घेणे-घेतले, घालणे-घातले, धुणे-धुतले, म्हणणे-म्हटले/म्हणाले; भिणे-भ्याले, विणे-व्याले, पिणे-प्याले/प्यायले, लेणे-‌ ल्याले, येणे-आले; पण, नेणे-नेले, मरणे-मेले, करणे-केले, जाणे-गेले, होणे-झाले; वगैरे. पाठवले-पाठविले, उगवले-उगविले, लपवले-लपविले(लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल कां...), अजमावले-अजमाविले, आचरले-आचरिले, कळवले-कळविले, आठवले-आठविले, जेवत-जेवीत(गोविंद गोपाळ हे दोन बंधू, जेवीत होते दहीभात लिंबू!), पांघरले-पांघरिले, बांधले-बांधिले(फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे..), दळले-दळिले, कांडले-कांडिले(दळिताऽ कांडिताऽऽ तुज गाईऽन अनंता!) इ.इ.

मराठीत अशी बरीच अनियमित क्रियापदे असावीत.