वाई आणि पांचगणी यां मध्यें शेरबाग म्हणून एक सुंदर बाग आहे. डोंगर उतारावर अतिशय सुंदर अशी ही बाग जरूर पाहावी. भिन्न पातळ्यांवर लाल मातीत जमिनीवरील विविध वृक्षांच्या, झाडांझुडपाच्या नयनरम्य, मनमोहक रचना, अधूनमधून झाडांच्या बेचक्यांत ठेवलेल्या बेचक्यांतील मडक्यांत ठेवलेल्या स्पीकरमधून पाझरणारें शास्त्रीय वाद्यसंगीत, कांहीं झाडांवर सृष्टीसौंदर्यदर्शनार्थ बांधलेलीं मचाणें, मुलांसाठीं मांडलेले खेळ, ठिकठिकाणीं मनाचा ठाव घेणारीं सुभाषितें, पॉली हाऊसमध्यें शेंकडाँ प्रकारचे निवडुंग आणि गुलाब, इ. इ. आहेत. वेळ कसा जातो कळत नाहीं. मुलांचा, मोठ्यांचा पाय निघत नाहीं. ५०रु. प्रतिमाणशीं तिकीट चारपांच वर्षांपूर्वीं होतें.

पांचगणीच्या पुढें मेप्रो कारखाना आहे. आवड असल्यास तोही पाहतां येतो. तसेंच महाबळेश्वरकडे जातांना डावीकडे गालिचा रेस्टॉरंट आहे. इथलें स्ट्रॉबेरी विथ क्रीम उत्कृष्ट असतें. इतर ठिकाणीं इतकें चांगले मला तरी आढळलें नाहीं.

महाबळेश्वरला जातांना प्रतिमाणशीं टोल भरावा लागतो. त्याच्या पावत्या जपून ठेवाव्या. फिरत फिरत महाबळेश्वरच्या हद्दीबाहेर गेल्यास पुन्हां आंत येतांना चालतात.

महाबळेश्वरच्या बाजारांत मार्गदर्शक पुस्तिका विकत मिळते. महाबळेश्वरला विल्सन पॉईंटला सूर्योदय व सूर्यास्त चांगला दिसतो. वेण्णा तलावही सुंदर आहे. तिथें नौकाविहार करतांना मजा येते. विल्सन पॉईंट ते वेणा लेक असा एक डोंगर उतारावरून जाणारा पण गोल गोट्यांच्या दगडांचा धोकादायक रस्ता आहे. तरूणांना एका थरारक प्रवासाचा आनंद मिळतो. पण त्यासाठीं स्थानिक वाटाड्याची जरूर पडते. सर्व ठिकाणें पंधरावीस किमी. दूरवर चढ उताराच्या डोंगराळ रस्त्यावरून असल्यामुळें फिरायला स्थानिक मोटार घ्यावी. भरपूर घासाघीस करतां येते. आवड असल्यास मधुमक्षिका पालन केंद्रही पाहायला मिळतें. इथली पादत्राणें, खासकरून सांबर कातड्याचीं छान असतात आणि योग्य दरांत मिळतात.

असो माझी टकळी फारच लांबली.

सुधीर कांदळकर