वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
खरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार) कीव यायला लागली. आणि शेवटी ...