माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
नवीन जागा ती पण परदेशात असली की शेजारी नसणार हे जवळजवळ गृहित धरलं होतं. कसंबसं एका जागी बस्तान बसवुन चार-दोन डोकी ओळखीची झाली होती तोवर घरंच बदललं...त्यामुळे नव्या जागी आल्याच्या दुसर्याच संध्याकाळी दारावर टकटक ऐकुन मी नवर्याला म्हटलं, "अरे, जरा हळू धाव आरूषबरोबर.बघ, खालच्या माळ्यावर राहणारे वरती आले वाटतं." नवर्याने दार उघडलं. मी किचनमध्ये फ़ोडणी देता देता मनाची तयारी करत होते; मुलाच्या दाणदाण धावण्याची काय काय कारणं द्यायची, माफ़ीनामा इ.इ. पण हे काय? दारातला आवाज चक्क "हाय मी साशा. तुमच्या खालच्या माळ्यावरच राहाते. काल मी पाहिलं तुम्हाला ...