बेधुंद येथे हे वाचायला मिळाले:
"जीवन म्हणजे ऊन पावसाचा खे़ळ आहे. जसं उन्हामागुन पावसाळा येतो तसंच दु:खामागुन सुख येतं,,," हे वाक्य मी शाळेत असताना नेहमी ए॑कायचो. कधी हे वाक्य सुविचाराच्या फळयावर लिहिलं असायचं तर कधी ते कुठल्यातरी निबंधाच्या पुस्तकात असायचं. त्या काळी मला या जीवनाबद्दलच्या वाक्यांमधले शब्द भारी भारदस्त वाटायचे पण कधी अर्थ समजला नाही. अर्थ समजावुन घ्यावं असही कधी त्या कोवळ्या वयात वाटलं नाही. आयुष्यातली एकेक वर्ष जसजशी कमी होत गेली तसतसं या शब्दांचा अर्थ मला गवसत गेला पण जीवनाबद्दलच गुढ मात्र वाढतच गेलं. आज ही जेव्हा मी मागे वळुन फळ्यावरचं ते वाक्य ...