माहिती तंत्रातील कामामध्ये जास्तीचे पैसे मिळतात कारण रुपयाशी युरो वा डॉलरचा असलेला विनिमय दर. खरेतर माणशी जितके पैसे आकारले जातात त्याच्या १०-२०% रक्कम पगार म्हणून तंत्रज्ञांना मिळते.
तसे बघितले तर अन्नधान्ये, भाजी, फळे निर्यात केले तर असेच उत्पन्न शेतकऱ्यांना देखील मिळेल.
चीनप्रमाणे यंत्रोत्पादित गोष्टीचे कारखाने काढले, व उत्पादने निर्यात केली तर कामगारांना मिळेल.
माहिती तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य एव्हढेच कि मनुष्यबळ या एका कच्च्या मालाच्या जोरावर हा उद्योग चालतो. भारतात (इंग्रजी बोलणारे) मनुष्यबळ भरपूर आहे.
विषमता दूर करायची असेल तर आणि 'आयटी'च्याच मार्गाने करायची असेल, तर इतर सर्व उद्योग निर्यातिभिमुख बनवावे लागतील.