कुठेच नामोनिशाण माझे नसेल ठेवायचे तुला
हवेस सोडायलाच तू मग फितूर अश्रूंवरी उदक

सुरेख द्विपदी.

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहऱ्यास इस्त्री करायला पाहिजे कडक

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक

ह्या दोन्हीही चांगल्या आहेत पण त्या जरा हझलेकडे झुकणाऱ्या वाटतात. (वाईट नाही पण एकाच ठिकाणी नको)

तुम्ही विनोदी आणि गंभीर असे दोन्ही प्रकारे चांगले लिहिता. मात्र त्या दोन्हीचे असे हे मिश्रण अनपेक्षितपणे करू नये असे वाटते.

मधेच गझला मधेच हझला असे कशाला करा बरे?
विनोद करण्यावरून आता मिल्या जरा तू पुढे सरक!

एकेरीत लिहिल्या बद्दल माफ करा हां पण तुमचे नाव 'मिल्या' असे असल्याने ते एकेरीत लिहिले.

-श्री. सर. (दोन्ही)