निज शब्दावर मागे चर्चा  झाली होती. त्यात नीज़ असा शब्द आला होता. हा झोप या अर्थाचा शब्द निद्रा या मूळ शब्दावरून आलेला आहे. त्याचा आणि निज या शब्दाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही हे त्या चर्चेत पुरेसे स्पष्ट झालेले आहेच. मनोगत चे जुने अंक चाळताना हा शब्द दिसला म्हणून आता इतक्या उशिरा प्रतिक्रिया पाठवीत आहे. मला वाटत जुलै २००५ मधली ही चर्चा असावी. त्यात नीज या शब्दाची व्युत्पत्ती कोणी दिलेली दिसली नाही म्हणून हा खटाटोप..चू.भू.दे.घे.