जोपर्यंत मुंबईचे अथवा महाराष्ट्राचे अर्थकारण मराठी भाषकांच्या हातात येत नाही तोपर्यंत मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळणे कठिण आहे. बाजारात मराठी भाषकांची पत आणि वट निर्माण झाली की आपोआपच समोरचा मनुष्य मराठीतून बोलू लागेल. त्यासाठी मराठी माणसानी आळस झटकून टाकून उद्योगाची कास धरली पाहिजे आणि योग्य मार्गाने पैसा कमवायला शिकले पाहिजे. मराठी भाषा आणि मराठी माणूस, मराठी सन्स्था यान्च्या सद्ध्याच्या सर्व समस्या ह्या  सर्व 'पैसा कमी पडतो' ह्या एका वाक्यात दडलेल्या आहेत. सरकार अथवा सरकारी नियम आणि कायदे ह्याद्वारे सक्तीने मराठीची उन्नती होणे शक्य नाही. किंबहुना सक्तीने कुठलीच गोष्ट घडून येत नसते. मुंबईतले अन्य भाषिक स्वखुशीने मराठीत बोलू लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी saturday club सारख्या सन्स्था संकल्पना राबविल्या गेल्या पाहिजेत‌ सम्र्द्धी आली की साहित्य व्यवहार वाढेल पुस्तकांचे खप वाढतील, मराठी साहित्यविश्वातली आणि अन्य ठिकाणचीही मरगळ दूर होईल;मराठीची पताका डौलात फडकू लागेल.