आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
नित्याच्या गोष्टींना थोडा नवा पर्स्पेक्टीव्ह द्यायचं आणि काहीतरी नवीन असल्यासारखी प्रसिद्धी करायची हे आधुनिक मार्केटिंगमधलं एक महत्त्वाचं तंत्र मानता येईल. आणि मार्केटिंगबाबत अमेरिका किती पुढे हे तर आपण जाणतोच. हे तंत्र काही केवळ पांढरपेशा, समाजरितीत बसणा-या गोष्टींनाच लागू पडतं अशातला भाग नाही. तर एरवी चार लोकांत न बोलण्यासारख्या व्यवसायांनीही या तंत्राचा छान वापर सुरू केलेला आहे, असं दिसतं. गर्लफ्रेन्ड एक्सपिरिअन्स ही टर्म याचाच पुरावा मानता येईल.