विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहेत यात वादच नाही पण त्याला "स्वतंत्र विदर्भ" हा पर्याय  नाही. कारण जे नेते आज वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत ते आजपर्यंत कुठे होते? विदर्भाने आजपर्यंत जितके नेते निवडून दिले त्यांनी निवडून आल्यावर विदर्भासाठी काय केले? आपल्याच तुंबड्या भरण्यात ते गुंग झाले. विदर्भ वेगळा झाला तरी त्यांच्यात काय फरक पडेल? उलट त्यांना खायला वेगळी कुरणे मिळतील. पुन्हा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तशाच राहतील.