मुंबईच्या मंत्रालयातील मंत्री व नोकरशहांची लॉबी जी प. महाराष्ट्राला व आजकाल मराठवाड्याला झुकते माप देते ती मोडून काढणे कुणालाही शक्य नाही. विदर्भ राज्य झाल्यास यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हयांतील ग्रामीण भागातूनही शेतकरी, लघु-उद्योजक आपल्या तक्रारी घेऊन नागपूरच्या मंत्रालयात सहज जाऊ शकतात. हे सध्या फार अवघड आहे. 

मध्य भारतातील सर्वाधिक गुणवत्ता असलेला प्रदेश असूनही केवळ सापत्न राज्यकर्त्यांमुळे विदर्भाची ही स्थिती आहे.