Marathwadi येथे हे वाचायला मिळाले:
मराठवाडा ही जशी संतांची भूमी तशीच संतकाव्याला घरा-घरात पोहोचविणाऱ्या संगीताची भूमी. संत नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर, दासोपंत, जनाबाई जसे या भागातले तसेच गोपालनायक, शांरगदेवदेखील याच मातीतले. अध्यात्म आणि संगीत जणू या घराचे अंगण आणि परसदार. अनेक राजवटींच्या आक्रमणांनी सोशिक झालेली जनता संगीताच्या बाबतीतसुद्धा सहिष्णुता बाळगून होती. ओव्या, गवळणी, गोंधळ, अभंग या लोकसंगीताबरोबरच कव्वाली, गजल, नातिया यातही इथली लोकं रमली. मराठी, उर्दू, तेलगू, कानडी, हिंदी या भाषा इथे एकत्र नांदत होत्या. उत्तर आणि दक्षिण भारत याला जोडणारे हे दख्खन पठार हिंदू व ...