Marathwadi येथे हे वाचायला मिळाले:
मराठवाडय़ात छोटी-मोठी अनेक आंदोलने झाली. कोठे बस डेपोसाठी तर कोठे रेल्वेलाईनसाठी, कधी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तर कधी बी-बियाणे आणि खतांच्या तुटवडय़ाच्या विरोधात. एकही जिल्हा असा नाही की जेथे आंदोलन झाले नाही. मराठवाडय़ात झालेल्या ठिकठिकाणच्या आंदोलनांची एकत्रित जंत्री करण्याचे काम अद्यापि कोणी केलेले नाही. विद्यापीठांनी अशी कामे करायला हवीत, अशी अपेक्षा असते. विद्यापिठीय संशोधनांचा दर्जा पाहता अशी अपेक्षा करणे निर्थक आहे असेच म्हणावे लागेल. या सगळ्या आंदोलनांची ढोबळमानाने गोळाबेरीज केली तर असे लक्षात येते की, सगळी बारीकसारीक आंदोलने ...