पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान आणि सोलापूर येथील जोशी कुलबंधु व भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ व २७ डिसेंबर रोजी सोलापूर येथे २९ वे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. सध्याच्या काळात अशी ज्ञाती संमेलने आयोजित करावी का, असा वादाचा मुद्दा उपिस्थत होऊ शकतो. मात्र मला असे वाटते की अशी ज्ञाती संमेलने भरविण्यात काहीही चूक नाही. वेगवेगळ्या प्रांतात आणि राज्यातील विविध शहरात पसरलेले कुलबंधु या निमित्ताने दोन दिवस एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, ...