विजयजी इंदिरा संतांची "रंग रंगुल्या" ही कविता अजून पुढे आहे. मला पण पूर्ण आठवत नाही. जेवढी आठवते तेवढी सांगते. तुम्ही दिलेल्या कवितेची ही पुढची कडवी आहेत. शेवटची मला ही आठवत नाहीत. काहीतरी त्या मुलाला आईची आठवण येते अशी आहेत. मिळाली तर जरूर बघा. ही माझी इयत्ता सातवीतली अतिशय आवडती कविता आहे.

तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजल्या शिकवाव्या

आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालूनी रंगित कपडे फूलपाखरा फसवावे

....... पुढे आठवत नाही.