वेदपाठी ब्राह्मणांच्या काही शाखांमध्ये ष ऐवजी/साठी ख उच्चारण्याची प्रथा आहे़. उदा. उषास्वयंवर ऐवजी उखास्वयंवर. इ.

काही मध्य आशियायी भाषांमध्ये ष/ख चे ध्वनी आढळतात.उच्चारांमध्ये फार सूक्ष्म फरक असतो. जर्मन भाषेत इश(श थोडा कठोर)चा उच्चार कधीकधी इख सारखा होतो. पुश्तू भाषा पण पख्तून लोक किंवा राष्ट्र . ख चा उच्चार घशातून केला की त्यातला क चा भाग कमी होउन महाप्राण(ह) जास्त होतो आणि तो उच्चार श्स किंवा श्ष ला जवळचा बनतो.तुर्की, रशिअन, जर्मन ह्या भाषा न जाणणाऱ्या माणसाने ऐकल्या तर त्यामध्ये श, ष, ख चे ध्वनी खूप आहेत असे त्याला वाटेल. भाषा उत्क्रांतीदर्म्यान एकमेकांपासून वेगळ्या होत असताना हे ध्वन्यंतर झाले असावे.