बापुजी अणे यांनी या विषयावर आंदोलन उभे केले होते त्यावेळी जर विदर्भ झाला असता तर कदाचीत विदर्भाला आज चांगले दिवस दिसले असते. कारण त्यावेळचे राजकारणी विदर्भातील चांगले होते. त्यानंतर वसंतराव नाईक यांनी तब्बल १७ वर्षे राज्य केले पण पुसद मध्ये अंगुराचे मळे करण्यापलिकडे काही केल्याचे माझ्या ऐकीवात नाही. माझ्या लहानपणी म्हणजे १९६५=६७ मध्ये नेपाळचे राजे भारत्तात आले की त्यांना घेउन सहपरिवार ताडोबाच्या जंगलात शिकारीसाठी ते नागपुर हून जायचे ते माझ्या अजुनही चांगले लक्षात आहे.