चर्चा सुरू करून पंधरवड्यासाठी भूमिगत राहिल्याबद्दल क्षमस्व!
आपल्या वरील प्रश्नाबद्दल असे वाटते की कितीही सदस्य जमले, तरी एक अतिउत्साही सदस्य लागेल असे दिसते. त्या अतिउत्साही सदस्याने go-between ची म्हणजे थोडक्यात पोष्टमनची भूमिका वठवावी लागेल (इंग्रजी विकीहाऊ मधील घोषणा फलक, बातम्या वगैरे मराठीत फडकवाव्या लागतील). त्यासाठी त्याने आपल्या नावासमोर तो go-between आहे असे दर्शवावे.
असा एक सदस्य जमल्यावर आपल्याकडे चातकाप्रमाणे वाट पाहण्यावाचून दुसरा उपाय नाही असे दिसते. 