आपल्या "पुढे काय" ह्या प्रश्नावर "खाली डोके वर पाय" असा पी. जे. मारल्यावाचून राहवले नाही. पण आपण माझा पी. जे. मनावर घेणार नाही अशी खात्री आहे.
सध्यातरी वाट बघणे आपल्या हातात आहे. जर काही आशादायी घटना त्या साईटवर घडली आणि जर कुणा चाणाक्ष सदस्याच्या ते ध्यानी आले, तर त्याने जरूर ते ह्या ठिकाणी निदर्शनास आणावे.
तरीही मी मराठी साईट उघडण्यासाठी कोणाचे दार ठोठावण्याचे गरजेचे आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोलावयाचे झाल्यास, नुसते (अर्थातच मराठीत संभाषण असलेले) व्हिडियो टाकण्यास काही हरकत नसावी. इंग्रजी कळफलकावर मराठीत लिहिताना तोंडाला किती फेस येतो याची कल्पना मला आहे (कारण हा प्रतिसाद टाकतानासुद्धा तो माझ्या तोंडाला आलेला आहे). तुम्ही जरी नुसता पुरणपोळी करण्याचा व्हिडियो टाकला, तरी ज्याचे मराठीत लिहिण्यासाठी हात शिवशिवत आहेत असा कोणीतरी सदस्य त्याची कृती टाईप केल्यावाचून राहणार नाही असे वाटते. फक्त तुम्ही पुरणपोळी असे त्याचे शीर्षक टाकण्यास विसरू नये. नाहीतर जर तुमचे पाककौशल्य कमकुवत असेल तर व्हिडियोवरून अंदाज न येऊन एखादा तिथे आम्लेटची कृती टाकायचा.
माझी थट्टा तुम्ही खिलाडुवृत्तीने वाचाल अशी आशा आहे.