विदर्भातील शेतकरी हा तसा भोळाच सकस जमीन व मुबलक कापुस अशी परिस्थीती असतांना मारवाडी समाज तेथे आला. त्यांनी तेथे कापुस विकत घेउन जिनींग चा व्यवसाय केला व स्वतःला सम्रुद्ध करून घेतले शेतकर्याला मात्र कर्जाच्या विळख्यात घातले. त्यात शेतकऱ्याचा आळशी पणा देखील कारणीभुत होता हे मान्य करावेच लागेल. त्यानंतर पश्चीम महाराष्ट्रा च्या सम्रुद्धीकडे बघून येथील पुढाऱ्यांनी साखर कारखान्याची टुम काढली आणि एकापाठोपाठ एक साखर कारखाने काढले. शेतकऱ्याला वाटले की आता आपल्याकडेही बुलेट मोटर सायकल आणि एंबेसडर येणार. लगेच उस लागवड सुरू झाली पण कसचे काय उस कापणी वेळेवर झाली नाही आणि शेतकरी नागवला गेला. साखर कारखानदारांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आणि हात झटकून दुसरे एखादे कुरण मिळते काय याच्या शोधात निघाले. बहुतांश साखर कारखाने बंद पडले. शेतकऱ्याचे शेअर पोटी जमा केलेले पैसे मात्र बुडले. तेल गेले, तुप गेले हाती धुपाटणे आले अशी गत झाली. मग आले शिक्षण संस्थेचे पीक भरमसाठ शिक्षण संस्था सुरू झाल्या आणि शिक्षणाचा ही बाजार सुरू झाला.

विदर्भात उड्डाण पुलासोबत च सिंचन व्यवस्थेची गरज आहे. पाण्याची पातळी कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे होते पण तेथे ही आमचे पुढारी नाकर्तेच ठरले. विदर्भाकडे सिंचनासाठी ठेवलेला पैसा पश्चीम महाराष्ट्राकडे वळत होता तेंव्हा हे पुढारी काय झोपा काढत होते किवा मुग गिळून बसले असतील तर ते कां हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. करोडो रुपयाचा Back log वर्षोंगणती तयार होत असतांना याना ते कळत नव्हते ईतके ते अजाण नक्कीच नव्हते. पण त्यांच्या पुढे ठेवल्या गेलेले आमीष त्यांना डोळे मिटून बसण्यास भाग पाडत होते हे न समजण्याईतका विदर्भाचा शेतकरी अजाण नव्हता आणि नाही पण तो परिस्थीती शी मिळवून घेणारा सोशीक मात्र नक्की आहे आणि याच कारणामुळे आज तो हतबल झाला आहे. वसंतदादा पाटील असो की शरदराव पवार असो अशी स्वतःच्या भागाचा विकास करणारी व दुरद्रुष्टी असणारी नेते मंडळी विदर्भाला मिळाली नाही हेच विदर्भाचे दुर्दैव्य. प्रत्येकाने आपले बंगले, शैक्षणीक संस्था, जंगम मालमत्ता ईत्यादीमध्य कशी वाढ होईल यापेक्षा पुढे पाहिले नाही.

विदर्भातील तरुण नोकरीसाठी मुंबई पुण्याकडे धाव घेतो. कॉल सेंटर सारखे ब्यवसाय ज्याला infrastructure म्हणून काहिच लागत नाही ते सुद्धा विदर्भात आणू शकले नाही असे नेते विदर्भाला लाभले तो विदर्भ कमनशीबीच म्हणावा लागेल. हरयाना सारखा टिचभर प्रदेशात आज गुरगाव, सोनीपत, या खेडेसद्रुश्य ठीकाणी कॉल सेंटर व आय टी सेंटर उभे आहेत तेथे विदर्भात अम्ररावती, अकोला, वर्धा, चंद्रपुर सारख्या शहरात सूशीक्षीत तरुण पानपट्यांवर किवा बार मध्ये आपली तरुणाई वाया घालवीतॉ याबाबत येथील नेते मंडळीना विचार करण्याची देखील सवड नाही या पेक्षा अधिक दैवदुर्विलास तो काय?