संस्कृतमध्ये स्वरांच्या उच्चारलांबीची ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत अशी तीन परिमाणे आहेत.  त्यांतल्या प्लुतसाठी तीन हा आकडा वापरावा लागतो.   अक्षरानंतर एक जागा सोडून ३ लिहिल्याचे मी अनेकदा पाहिले आहे. उदाo इ, ई आणि ई ३. असेच आ ३,
ऊ ३, ॠ ३, ॡ ३, ए ३, ऐ ३, ओ ३,  अ‍ौ ३ वगैरे. ए, ऐ, ओ आणि अ‍ौ यांना ऱ्हस्व नाही, फक्त दीर्घ आणि प्लुत. १ आणि २ हेही असेच उच्चारलांबी दर्शवणारे आकडे असावेत. उदाo क्व  वोऽश्वाः--ऋग्वेद ५. ६१. २; रथानां न ये राः--ऋगo १०. ७८. ४;
शतचक्रं यो ३ ह्य:--ऋo १०. १४५. ४ वगैरे.

संस्कृत व्याकरणाच्या पुस्तकांत मात्र असे १ आणि २ आकडे का लिहायचे याचा उल्लेख नसतो.