कप, ग्लास हे दोन्ही शब्द द्रवपदार्थ पिण्यासाठी वापरायचे भांडे ह्या अर्थाने आपण वापरतो. मराठीमध्ये पेला,फुलपात्र, प्याला, चषक वेगवेगळ्या संदर्भात त्याच अर्थाने वापरले जातात. गडू,लोटा,साटके,लोटके,गाडगे,वाडगा,कुंडले, चंबू असे आकार आणि वापर याबाबतीत स्पेसिफिक शब्द मराठीत आहेत, पुनर्वापराजोगे आहेत.पंचपात्र अथवा पंचपात्री हा शब्द देखील त्यात जमा करायला हरकत नाही.५०/६० वर्षांपूर्वी जर्मन सिल्वर चे कप निघाले होते तेव्हा त्यांचा आकार गडूसारखाच असायचा.

कषायपेयपात्र हा शब्द म्हणून सुंदरच आहे, पण एकतर तो स्पेसिफिक म्हणजे चहापुरताच वापरण्याजोगा आहे आणि दुसरे म्हणजे तो यूज़रफ्रेण्डली नाही.(ह्या दोन्ही इंग्लिश शब्दांना चपखल मराठी शब्द सुचवा बुवा! वापरकर्तानुकूल हे काही तितकेसे भावत नाही.)