विदर्भातील मुख्य पीक म्हणजे कापुस. १९७० मध्ये एक क्वींटल कापुसाची कीमत व १२ ग्राम सोने हे एकाच किंमतीचे होते. आज कापसाला १७५० प्रती क्वीटल भाव सरकार देते आणि सोन्याचा भाव आहे १७०००/- कापसाच्या लागवडीला लागणारा खर्च हा एकरी १०००० रुपये असून एकरी उत्पादन हे ३-४ क्विंटल इतके होते म्हणजे १०००० खर्च केल्यावर त्याला सरकार जास्तीत जास्त ८००० उत्पन्न देते म्हणजे दरवर्षी तो एकरी २००० च्या गढ्ढ्यात जातो. असे वर्षोंगणती सुरू आहे. तो जमीनीला आपली माय समजतो त्यामुळे शेत विकायचा विचार ही त्याच्या मनात येत नाही मग तयाने मरण पत्करायचे नाही तर काय करायचे . मंत्रालयातील मंत्री हे गणीत कसे काय मांडतात देव जाणे तसे ही गणीत जाणण्याइतके ते सुशीक्षीत व सुसंस्कृत आहेत किंवा काय हाहि एक लाख मोलाचा प्रश्न आहे.