ह्या गझलेने ताजेपणाचा अनुभव नक्कीच दिलाय...
काहीच पेटवाया सांगू नकोस त्यांना
क्रांतीत मागच्या ते जळले बरेच होते
टोपीत पांढऱ्या त्या लपणार ते कितीसे
आपादमस्तकी जे मळले बरेच होते
म्हणता कसे तुम्ही की 'मी पाहिलेच नाही'
डोळ्यासमोर तुमच्या घडले बरेच होते.. हे तीनही शेर आवडलेत
आणि मायाचा शेर सुद्धा चपखल!
स्वर-काफिये टाळावेत असे माझे वैयक्तिक मत आहे
-मानस६