श्रु मध्ये श, र आणि त्यापुढे येणार उकार आहे. इंग्रजीत ते shru असे लिहिता येईल.
शृ मध्ये श च्यापुढे ऋ हा स्वर आहे. दुर्दैवाने त्याचा उच्चार मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये चुकीचा होतो.
मराठीत आपण त्याचा उच्चार shru असा तर हिंदीवाले shri असा करतात.
खरा उचार shr असा केला पाहीजे. म्हणजे र (ऋ) च्या उच्चारानंतर दुसरा कोणताही स्वर (अ, आ, उ, इ वगैरे) नको.
श्रु मधील उ गाळून पहा, बरोबर उच्चार कसा ते कळेल.