लेखाजोखामध्ये नेमकेपणा आहे, आणि गोळाबेरीजमध्ये भोंगळपणा. त्यामुळे हे दोन शब्द एका अर्थाचे नाहीत. लेखाजोखाचे क्रियापद करणे हे आहे, तर ताळमेळचे घालणे, जमवणे, किंवा नसणे. त्यामुळे हे दोन शब्द एकाच अर्थाचे वाटले तरी त्यांचा उपयोग भिन्‍न आहे. लेखाजोखाला नकारात्मक अर्थ नाही, ताळमेळला आहे. ताळेबंद-जमाखर्च जुळणे/जुळवणे/जमणे. हिशोबठिशोब मागणे, जाबजबाब घेणे, स्पष्टीकरण मागणे/देणे, सत्यासत्य समक्ष ताडून पाहणे, हिसाबकिताब माँगना/करना हे सर्व शब्दप्रयोग साधारण समान अर्थाचे आहेत.  असे असले तरी,  लेखाजोखासाठी  रुजुवात हा एकच सुयोग्य प्रतिशब्द होईल; दोघांना करणे आणि होणे हीच क्रियापदे लागतील.
पण खरे सांगायचे तर, लेखाजोखा हिंदी असला म्हणून काय झाले, फार छान शब्द आहे मराठीने अवश्य स्वीकारावा.