पद्धतीनें मांडली आहे. पैलू गुणोत्तर म्हणजे लांबीःरुंदी वा रुंदीःउंची काय हो?
संगणकाला एखादा प्रिंटर जोडून कार्यरत - इन्स्टॉल केला कीं 'वर्ड'मधून 'पेज सेट अप' जुळवतांन कागदाचॅ आकारमान बी१, बी२, सी१, सी२, इन्व्हलोप, इ. दिसतात. तेंही एक कोडेंच आहे. मीं आपला ए३ वा ए४ नसल्यास मेंदूला शीण  न देतां 'कस्टम' मध्यें जाऊन लखोट्याचें आकारमान मोजून लिहितों.

फोटोस्टॅट वा झेरॉक्स मशीनवरहि ए४, ए३, बी३, बी४ इ. खुणा असतात.

आत्तां गुगलून पाहिल्यावर विकीपेडियामध्यें ए, बी आणि सी तिन्हींच्या १, २, ३, इ. आकारमानांचा तक्ता मिळाला. पण त्यामागील सूत्र मिळालें नाहीं.

शक्य झाल्यास यांवरही एखादा लेख लिहावा म्हणजे बरींच कोडीं सुटतील.

सुधीर कांदळकर