पार्श्वगायनापेक्षां अवधूत दिखाऊपणाला - शोमनशिपला, एक्स फॅक्टरला, जास्त महत्त्व देतो. स्वराची अचूकता त्याला फारशी कळत नाहींच.
निव्वळ गायनकलेशीं संबंधित असलेल्या सूचना केंव्हांही कोणत्याही गानप्रकाराला उपकारकच आहेत.
मैफिलींचें चांगल्या तऱ्हेनें पणन - मार्केटिंग करून प्रायोजक मिळवले तर जरूर मैफिलीवर चरितार्थ चालूं शकतो. मात्र गायकांत सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता पाहिजे. हल्लीं लग्नांतसुद्धां लोक मैफिली ठेवतात. मारवाड्यांच्या लग्नांत तर एका बाजूला नवोदित कलाकारांचें गझलगायन चालूं असतें. मुख्य म्हणजे नवें दुर्बोध असतां नये व प्रयोगांत नीरक्षीर विवेक पाहिजे.
अर्थातच पार्श्वगायन अपरिहार्य नाहीं. पार्श्वगायनांत स्पर्धा व चढाओढ फार असून ती निकोप नाहीं. तेव्हां दर्जा असूनही अपयश वा दर्जा नसतांना यश असेंहि चित्र कांहीं वेळां दिसतें.

सुधीर कांदळकर