केदारजी तुम्ही उपस्थित केलेला हा विषय अतिशय गंभीर आहे. मी स्वतः आय. टी. मध्ये सध्या द्वितीय वर्षात अभियांत्रिकी डीग्री साठी शिक्षण घेतोय. हं, तसं मला लहानपासूनच टेक्निकल अन अंतराळ संबंधित विषयांची खुप आवड आहे, अन माझे सर्व हट्ट पुरवणारी ही शाखा आहे, त्यामुळे मी काही असाच आय. टी. मध्ये घुसलेला नाहिये. पण ज्या कोणी करीयरच्या नांदात ५-१० वर्षांपूर्वी या शाखेकडे कूच केली होती, त्यांची आजची परिस्थिती, ते यशस्वी झाले असले/नसले तरी, त्यांच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांच्या, आजच्या परिस्थिती पेक्षा खुपच उंचावलेली आणि स्थिर अशी आपल्या समाजात दिसते आहे. याची कारणे सुद्धा तशीच आहेत. आय. टी . ची कल्पनाच मुळी २१व्या शतकातील नवीन अन आतापर्यंत घडलेली सर्वात मोठी गोष्ट मानायला हवी. आजच्या तारखेला, जगात अशी कोणतीच फील्ड उरलेली नाही, जी आय. टी. ने पादाक्रांत केलेली नसेल. आणि यासाठी खुप मणुष्यबळ लागते... नेमकी हीच भानगड या तफावतीला(तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाला) कारणीभूत ठरली असेल, असं माझं वैयक्तिक मत आहे..