होय, मी हे पुस्तक वाचलंय. अतिशय सुंदर आणि जीभ चाळवणारी शैली आहे भोब्यांची. रविंद्र पिंगे आणि जयवंत दळवी यांचेही मत्स्यप्रेमावरचे लेख अप्रतिम आहेत. याचबरोबर मी 'पाण्यातले दिवस' हे एक मस्त पुस्तक पूर्वी वाचले होते. गोड्या पाण्यातील मासे आणि ते पकडणाऱ्या धीवरांचे जीवन यावर ते आहे. लेखक स्वतः कोळी समाजातील असून त्याचे जीवनानुभव या पुस्तकात आहेत. पण लेखकाचे नाव आठवत नाही. मारुती चितमपल्लींचाही एक रिपोर्ताज लेख अलिकडच्या एका दिवाळी अंकात वाचला होता. चकवा चांदण मध्ये त्यांनी इटियाडोहच्या ढीवरावर लिहिलेला लेख अप्रतिमअ आहे. किती बारकावे उमगतात त्यातून मत्स्यजीवनाचे.