अष्टविनायक यात्रा पुणे ते पुणे करणे जास्त सोयीचे आहे. तसे शास्त्रोक्त पद्धतीने जावयाचे असल्यास, प्रथम मोरगाव च्या गणपतीला एक नारळ ठेवून, यात्रेचा संकल्प सोडून आठ गणपती झाल्यावर पुन्हा मोरगावचे दर्शन घेणे आवश्यक आहे.

तसे पुण्यात रात्री परतून दोन दिवसच पुरतात, पण जर  अधिक कंफर्टेबली जायचे असेल तर पहिल्या रात्री सिद्धटेकहून निघून लेण्याद्री ला मुक्काम करून दुसरे दिवशी सकाळी उठून लेण्याद्रीचे दर्शन घेऊन मग ओझर, पाली, महड करून पुन्हा मोर्गावलाही येउन यात्रा पूर्ण करता येईल.