माझ्या अतिशय आवडत्या लेखकाबद्दल लिहिलेल्या इतक्या सुंदर लेखाबद्दल धन्यवाद!
फास्टर फेणे, चंद्रावर स्वारी ही पुस्तके आजही आवडतात.
त्यांच्या पात्रांची नावे वैशिष्ट्यपूर्ण असत - (बरीचशी अनुप्रासयुक्त) उदा. फा. फे., इंद्रू इनामदार, गपा गिरमे, नंदू नवाथे, बिपीन बुकलवार.
बुकलवार हा शब्द book lover वरून तयार केला होता (कारण त्याला वाचनाची आवड असते) - असे ह्या वर्षी एका दिवाळी अंकात वाचले आहे.