बिपीन बुकलवार बद्दलचा हा खुलासा खरा आहे. मला आश्चर्य वाटत ते भागवतांच्या निर्मितीक्षमतेच. किती विविध प्रकारच लिखाण सातत्याने केले त्यांनी!!! सतत लिहीत राहणे आणि सतत टवटवीत , निखळ आनंद देणारे तरीही दर्जेदार असे लिखाण करणे हे येर्या गबाळ्याचे काम नोहे!!
लिलावतीबाई भागवतांनी सुद्ध फार सुंदर लिखाण केलंय. त्यांची "चल उडूनी पाखरा" ही कादंबरी केवळ अप्रतिम आहे.