चर्चेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न नाही पण राधिकेच्या मतांना दूजोरा आहे.
वृकोदर म्हणतात "बाकी क्षेत्रातील पोषाखांवर, जसे सैनिकी पोषाख, अतीस्वच्छ कक्षातील पोषाख, पाणबुडे, पोहण्याचा वेष यात कितीतरी संशोधन झाले आहे. गेल्या शंभर वर्षात त्यात अनेक सुधारणा झाल्या. तसे सोवळ्याचे झाले का? आजिबात नाही. कारण ती एक रुढी आहे. त्यात असलेच तर मिथ्य विज्ञान आहे. "
त्या क्षेत्रात सुधारणा झाल्या कारण त्या साठी आर्थिक पाठबळ उभ होत. सोवळ्यावर संशोधनासाठी कधी निधी उभा राहिल्याचे ऐकिवात नाही.
या सगळ्याला कारणीभूत आहे आपलाच न्यूनगंड. त्यामुळेच हजारो वर्षांपासून माहीत असलेले हळदिचे औषधी गुणधर्म सुरक्षित करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करुन पेटंटच्या लढाया लढाव्या लागतात. वैदिक गणिताचे ज्ञान आता जगाला कुठल्या भारतीय विद्यापीठातून न मिळता केंब्रिज आणि ऑक्स्फ़र्ड विद्यापीठांमधून मिळणार आहे.
ॐकाराचे मनोवैज्ञानिक गुणधर्म प्राचिन काळापासून आपल्याला माहीत आहेत पण आज त्यावर केवळ पश्चात्य विद्यापीठांमधे संशोधन सुरु आहे, आपल्याला ही कामे करायला वेळ नाहीये कारण आजचा तरुण संशोधक call center मधे काम करुन भरपूर पैसा कमावतोय.
विषयांतराबद्दल क्षमस्व.
-आस्वाद