संजय (यांची क्षमा मागून) यांचा अध्यात्मिक दृष्टिकोन थोडा बाजूला ठेवून विचार केला, तर मला एक शंका आहे बऱ्याच दिवसांपासून; त्याचे स्पष्टिकरण कोणाला माहित असेल तर अवश्य द्यावे.
१) उत्तर दक्षिण झोपू नये (बेड उत्तर दक्षिण असू नये) - ह्याचा संबंध हा, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये, असा असावा, असा मी अर्थ लावला आहे. हे बरोबर आहे का? नसेल तर खरं कारण काय आहे? 
२) घराचा दरवाजा दक्षिणेकडे (आणि नैऋत्येकडे) असू नये - ह्याचे नक्की कारण काय आहे? घर घेताना वगैरे ह्या क्रायटेरियामुळे (मराठी? ) फार अडचण होते, त्यामुळे हे माहित असणे फार आवश्यक आहे...

(दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे वगैरे असली कारणं न देता, जर कोणाला शास्त्रीय कारणे माहित असतील तरच द्यावीत... )