श्र मध्ये 'र' हे व्यंजन असल्यामुळे त्यालाजोडून अ हा स्वरही येतो. शृ मध्ये शेवटी अ हा स्वर येत नाही.
श्र मध्ये 'र' चा उच्चार झाल्या नंतर आपली जीभ 'अ' च्या आवाजासाठी टाळू पासून दूर होते. शृ चा उच्चार करताना ती तशी होत नाही असे आढळून आले. म्हणजे ऋ म्हणताना 'र' म्हणायला सुरुवात करायची, पण जीभेची कोणतीही हालचाल न करता उच्चार संपवायचा. ध्वनी जास्त वेळ उच्चारल्यास दीर्घ ऋ होईल ( दीर्घ ऋ मनोगतावर टंकीत करता आला नाही).
जसे ऋ चे तसेच लृ चे (क्लृप्ती मधला स्वर).
य (इ) , र (ऋ), ल (लृ), व (उ), स, श, ष, ह ही सर्वच व्यंजने दोन स्वरांना जोडून तयार झालेली आहेत. त्यातील स श ष ह यांचे स्वर (आपण त्यांना स्वर म्हटले तर) प्रचारात नाहीत. ळ बिचारा या सर्वांहून 'वेगळा'. म्हणून त्याची संस्कृतातून हकालपट्टी करण्यात आलेली असावी.
ऋ, लृ, आणि इतर स्वर यांत फारसा फरक नसावा. या दोघांचे नशीब वाईट म्हणून त्यांना जास्ती मते मिळाली नाहीत.