मी पूर्वीची सगळी चर्चा वाचली. माझा दृष्टीकोण अध्यात्मिक वाटला तरी तो प्रॅक्टिकल असतो कारण अध्यात्म ही सामान्य ज्ञानाची परिसीमा आहे.

यावरून एक जोक सांगतो. माझ्या मित्रानी आमच्या एरियात (जिथे फ्लॅट मिळणे अतिशय दुर्मिळ आहे) एक सुरेख दोन बेडरूमचा फ्लॅट (दोन बाल्कनीज, दोन टॉयलेट ब्लॉक्स) केवळ नशीबानी मिळवला. फ्लॅट ताब्यात घेतल्यावर त्यानी त्याच्या बायकोला (जी डॉक्टर आहे) मोठ्या उत्साहानी तो दाखवायला नेला तर तिनी त्याचे दार अमक्या दिशेला (नैऋत्य का काय) आहे म्हणून तिथे रहायला साफ नकार दिला. माझ्या मित्राची इतकी असहाय परिस्थिती झाली की बायको की फ्लॅट! तो माझ्याकडे आला, मी त्याला अतिशय सोपा उपाय सांगीतला " बायकोला दाराकडे पाठ करून घरात यायला सांग" (म्हणजे जस्ट रिव्हर्स द एन्ट्री). त्याच्या बायकोला यावर काहीही उत्तर सापडेना आणि दाराकडे पाठ करून घरात शिरण्याचा वेडेपणाही करवेना. या घटनेला चार-पाच वर्ष झाली असतील त्यांच आगदी सुखात चाललं आहे! किमान बुद्धीवापरून सगळं सोडवता येतं. मॅग्नेटिक फिल्डचा परिणाम (म्हणजे झोपण्या वगैरेच्या बाबतीत) तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर निश्चीत करून बघा पण बेडची दिशा बदलणे ही आगदी सोपी गोष्ट आहे.       

संजय