डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


“अहो.. ऐकलत का?, सॅंन्टा भाऊजी आलेत”, दरेकर वहिनी एका हाताने दार उघडत तर दुसऱ्या हाताने चेहरा पदराने टिपत म्हणाल्या.

सॅंन्टाचे नाव ऐकताच बन्या आणि चिंगी, “सॅंन्टा काका आले, सॅंन्टा काका आलेssss” करत बागडत बाहेर आले.

मागोमाग दरेकर काकाही चट्यापट्याचा पायजमा आणि पोटाच्या वर गेलेला गंजीफ्रॉक निट करत बाहेर आले.

उन्हाने लाल-गुलाबी झालेला सॅंन्टा हाश-हुश करत समोरच्या सोफ्यावर विसावला. नेहमी कडक आणि लालं भडक कपड्यात वावरणाऱ्या सॅंन्टा चे कपडे चुरगळलेले होते, लाल-भडक रंग सुध्दा उन्हाने उडला होता. हातातले बेचके त्याने ...
पुढे वाचा. : जिंगल बेल्स