गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

ही योगायोगाची साखळी खरचं मजेशीर आहे. तीन दिवसांपूर्वी कपाट आवरताना स्लॅमबुक मिळाली. परत वाचून काढली. विशेषत: 'opinion about me' ची वाक्ये. खाल्ल्या वडापावला जागून झाडून सगळ्यांनी चांगल्याच ओळी खरडल्या आहेत, पण बरं वाटत परत वाचताना.

श्रेयसीने लिहलेली सुंदर अक्षरातली पाने मात्र मनापासून लिहलेली आणि कवितेत भिजलेली! इतकी हळवी मुलगी मी कधीच पाहिली नाही. दुसर्‍या दिवशी ’काय गं, कशी आहेस’ असा फ़ोन आणि कधी भेटायच हा प्रश्न! मग त्यावरं आपण टेलीपथी असण्याबद्द्ल शेरा वगैरे.. आणि आज अजय चा टॅग केले असल्याचा ’बेधुंद’ मार्फ़त निरोप. मजाच ...
पुढे वाचा. : पुढचा टॅग..