चुरापाव येथे हे वाचायला मिळाले:
मलाही टॅगलंच ... गेले काही दिवस सगळे एकमेकांना टॅगूनच बोलताहेत. आता चला परीक्षेला सामोरे जा. तसा पेपर फार पूर्वीच फुटला होता (आणि उत्तरं वाचून बाकीचे फुटले होते) सगळे प्रश्न एका शब्दात उत्तरे द्या. या नियमाचं पहिल्यांदा एका शब्दात उत्तर देतो "सॉरी". थांबा तुळशीची पान खावून येतो, आमची शाळेपासूनची समजूत की तुळशीची पान चघळत परीक्षा दिली तर चांगले गुण मिळतात, हे शाळेच्या इतर मुलांमध्ये मी पसरवलं. परीक्षेच्या काळात सगळ्या तुलसीज जीव मूठीत धरून असायच्या.