नीलहंस, तुमची 'प्रतिमा' आवडली. तुमचे इथे सहर्ष स्वागत!

राधिका, तो मंदाक्रांता वृत्ताचा आकृतीबंध आहे. यापूर्वीच्या समस्यापूर्ती बारकाईने पाहिल्यास सर्व तपशील पूर्वीच विस्ताराने चर्चिल्या गेलेला दिसून येईल. रुची दाखविल्याखातर धन्यवाद.

छाया, उत्तम पूर्ती. फक्त शेवटल्या ओळीत 'होई' ऐवजी 'दावी' जमेल.
एरव्ही 'मृगजळ' सुरेख! तुमचेही सहर्ष स्वागत.

आणि हो, स्वागतासाठी प्रथेप्रमाणे आणखी एक पूर्ती ...

लेखांचीही नकळत पडे, छाप लोकांवरी ती ।
गाण्यांनीही रिझवत असे, छान श्रोत्यांसही ती ॥
काव्यावाटे कळवत जना, गूज ती अंतरीचे ।
कीर्तीचे कौतुक पसरुनी, दूरची दूर जाते ॥