स, श, ष, ह ही सर्वच व्यंजने दोन स्वरांना जोडून तयार झालेली आहेत.
त्यातील स-श-षऱ्ह यांचे स्वर (आपण त्यांना स्वर म्हटले तर) प्रचारात नाहीत. ही माहिती कुठे मिळाली? कधी वाचलेली नाही. 'ह' हे अक्षर अ पासून निघाले असे ऐकले होते. तसेच त पासून स, त्स पासून श, आणि छ पासून ष. खरेखोटे ठाऊक नाही. जिथे वाचले होते ते पुस्तकही आठवत नाही.
शिफ़्टची कळ दबलेली असताना आर्६आय् या कळी दाबल्या की दीर्घ ॠ, आणि एल्६आय् दाबल्या की दीर्घ ॡ उमटतो.
अ-आ पासून ऌ-ॡ पर्यंत सर्वच स्वर एकमेकांपासून वेगळे आहेत. केवळ कमी वापरामुळे ऋ, ऌ मागे पडले. ळ-ळ्ह हे दोन्ही वैदिक संस्कृतमध्ये होते त्यांच्या ऐवजी अभिजात संस्कृतमध्ये ड आणि ढ आले. मराठीने ळ संभाळून ठेवला आणि दाक्षिणात्य भाषांनी ळ आणि ळ्ह या दोघांना सांभाळले.